राजापूरात आ. किरण सामंत यांचा मनसेला दणका

मनसेचे तालुका अध्यक्ष  पंकज पंगेरकरांसह मनसेच्या पदाधिकारी व मनसैनिकांचा  
राजापूर प्रतिनिधी : राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी राजापुरात मनसेला जोरदार धक्का दिला आहे. मनसेचे तालुका अध्यक्ष पंकज पंगेरकर यांच्यासह तालुका उपाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांसह शेकडो मनसैनिकांनी आ. किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम झाली असून या प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत त्यांचा योग्य सन्मान केला जाईल अशी ग्वाही आ. सामंत यांनी दिली आहे.
राजापूर विधानसभा मतदारसंघात आ. किरण सामंत यांनी राबविलेली विकासकामे, सर्वसामान्य जनतेशी असलेला थेट संवाद, प्रत्येक गावातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची भूमिका आणि कार्यकर्त्यांना दिले जाणारे बळ यावर प्रेरित होऊन आंम्ही आ. सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना आ.  किरण सामंत म्हणाले शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. विकास, जनसेवा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान ही आमची भूमिका आहे. पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल. राजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया, पक्षवाढीसोबतच जनतेच्या प्रश्नांचे निराकरण हेच आपले प्रमुख ध्येय असून, प्रत्येक गावात विकासाची गती अधिक वाढविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे अशी ग्वाहीही आ. सामंत यांनी दिली.
या प्रवेशकर्त्यांमध्ये मनसेचे तालुका अध्यक्ष  पंकज पंगेरकर, लालूका सचिव संजय जड्यार, उपतालुका अध्यक्ष., जयेंद्र कोठारकर, गुरुप्रसाद गवाणकर – माडबन ग्रामपंचायत सदस्य, सादिक काझी विभाग संघटक सुरेंद्र मयेकर विभाग अध्यक्ष, उमेश ढाले ,शंकर लांबे राकेश कणरी, जयेश पडवळ, नरेश आंबेकर, सुनिल नारेकर नाटेकर, मनोज वाडकर, हर्ष जडयार, संकेत वाडेकर,योगेश सुर्वे,प्रमोद आंबेरकर, संदीप नाटेकर,मनोज आंबेरकर,रामचंद्र शिरगांवकर.मिलिंद देवक,मिलिंद आडिवरेकर आदींसह शेकडो मनसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेश प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले, सभापती नंदीनी कदमा यांसह शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध गावांतील कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.