कोकण रेल्वे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन निर्णय
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांना जोडण्यात आलेल्या अतिरिक्त डब्यांची तात्पुरती वाढीव सुविधा पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोकण रेल्वेने ३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, १६५९५/१६५९६ केएसआर बेंगळुरू-करवार-केएसआर बेंगळुरू पंचगंगा एक्स्प्रेस आणि १०११०/१०१०९ करवार-मडगाव जंक्शन-करवार एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे वाढविण्याची सुविधा पुढेही कायम ठेवण्यात येणार आहे.
या दोन्ही गाड्यांच्या ताफ्यात ३ टियर एसी इकॉनॉमीचे २, स्लीपरचे १ आणि जनरलचे २ अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे या गाड्यांचा एकूण भार १९ एलएचबी डब्यांचा राहणार आहे.
पंचगंगा एक्स्प्रेसच्या गाडी क्रमांक १६५९५ (केएसआर बेंगळुरूकडे जाणारी) मध्ये अतिरिक्त डबे १ सप्टेंबर २०२६ पर्यंत, तर गाडी क्रमांक १६५९६ (करवारकडे जाणारी) मध्ये २ सप्टेंबर २०२६ पर्यंत कायम राहतील.
त्याचप्रमाणे १०११० कारवार-मडगाव एक्स्प्रेसमध्ये अतिरिक्त डबे २ सप्टेंबर २०२६ पर्यंत, तर १०१०९ मडगाव जंक्शन-कारवार एक्स्प्रेसमध्ये २ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढीव डबे उपलब्ध राहणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या संख्येने प्रवासी येत असल्याने रेल्वेगाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. प्रवाशांनी गाड्यांचे अद्ययावत थांबे व वेळापत्रक अधिकृत रेल्वे संकेतस्थळावर तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












