साडवलीतील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या वतीने माजी राज्यमंत्री व प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री श्री. रवींद्र माने यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वा. महाविद्यालयाच्या आवारात संपन्न होणार आहे.

सदर उपक्रम ‘श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर, बी. के. वालावलकर रुग्णालय आणि ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, या उक्तीनुसार एका व्यक्तीच्या रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचू शकतात. या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदान करू इच्छिणाऱ्या सर्व दात्यांनी खालील लिंकवर आपली आगाऊ नोंदणी निश्चित करावी:
नोंदणी लिंक: https://forms.gle/MLcPm6yNQBF4ibBH7