खेड शहर मराठा समाजातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार

खेड (प्रतिनिधी) : खेड शहर मराठा समाजाच्या वतीने खेड नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तसेच सर्व नगरसेवकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. खेड नगरपरिषदेच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी मराठा समाजातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी शरद शिर्के होते, तर नंदू साळवी यांनी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. या कार्यक्रमास मराठा समाजाचे सदस्य बुवा शिंदे, दीपक नलावडे, अंकुश विचारे, अवधूत मोरे, सुभाष देसाई, शेखर भोसले, सुरेश चिकणे, प्रशांत सावंत, अनंत विचारे, राजू आंब्रे, संग्राम कदम, सावंत सर, हेमंत साळोखे, विवेक कदम, तुषार सापटे यांच्यासह शुभदा साळवी, सौ. पूर्वा साळवी, सौ. अश्विनी शिर्के, सौ. सुप्रिया भोसले, सौ. समिधा चिकणे, स्मिता विचारे, श्रीमती नलावडे, श्रीमती जाधव मॅडम, तसेच कदम मॅडम, विचारे मॅडम व चिकणे मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमास शहरप्रमुख श्री. कुंदनजी सातपुते, निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक श्री. संजयजी मोदी, माजी नगरसेवक मिनार चिखले, नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. माधवी ताई राजेश बुटाला, शिवसेना गटनेते नगरसेवक निकेतन पाटणे, भाजप गटनेते रहीम सहीबोले यांच्यासह नगरसेवक श्री. सतिश ऊर्फ ‘पप्पू’ चिकणे, सुनिल दरेकर, भुषण चिखले, प्रमेल चिखले, आरीफ भाई मुल्लाजी, स्वप्निल सैतवडेकर व तोसीफ खोत उपस्थित होते. तसेच नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर, संजना कुडाळकर, सौ. दिप्ती शिगवण, सौ. निता आंब्रे, सौ. आरती पवार, सौ. रसिका खेडेकर, सौ. अंजुम कुरणे, सौ. वर्षा सापते व स्वप्नाली चव्हाण यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली.
यावेळी सत्कार स्वीकारताना सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी व नगराध्यक्षा सौ. माधवी ताई बुटाला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मराठा समाजाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक करत समाजाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. खेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. एकोपा, उत्साह आणि सकारात्मक संदेश देणारा हा सत्कार समारंभ उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.