उद्या सकाळी 9 वाजता NSS विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सहभाग
आचरा* -अर्जुन बापर्डेकर
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून *”हर घर तिरंगा”* अभियानांतर्गत उद्या *दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता* आचरा पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
ही मोहीम *आचरा ग्रामपंचायत* आणि *आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
या मोहिमेत महाविद्यालयातील *NSS स्वयंसेवक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक* मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. समुद्रकिनारा आणि परिसर स्वच्छ करण्यासोबतच *स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिक मुक्त परिसर* याबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे.
सर्व ग्रामस्थ, युवक आणि वाचनप्रेमींनी या देशभक्तीपर आणि सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












