रिगल आयटीआयमध्ये प्रवेशासाठी मुदतवाढ

चिपळूण (प्रतिनिधी) : रिगल एज्युकेशन सोसायटी संचालित रिगल आयटीआय या महाविद्यालयात प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे. दि. २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. रिगल आयटीआय हे क्यू.सी.आय. दिल्ली मान्यता प्राप्त असे कोकणातील एकमेव आयटीआय कॉलेज आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी थेट इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थी सिव्हील ड्राफ्ट्समन व आर्किटेक्ट ड्राफ्ट्समन या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार, केंद्र सरकार, रेल्वे, पीडब्ल्यूडी, म्हाडा इत्यादी सरकारी व खाजगी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. वेल्डर या अभ्यासक्रमाला दहावी पास झालेला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला रेल्वे, इस्रो, एम.एस.ई.बी., खाजगी कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच एक वर्षाचा डिझेल मेकॅनिक हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दहावी पास पात्रता आवश्यकता आहे. या विद्यार्थ्यांना रेल्वे, डीआरडीओ, वेगवेगळ्या गाड्यांचे शोरूम, एसटी महामंडळ, एम.एस.ई.बी. इत्यादी ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तर स्वतःचे वर्कशॉप देखील ही विद्यार्थी सुरू करू शकतात. कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या अभ्यासक्रमाला दहावी पास झालेला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला माहिती तंत्रज्ञान, सरकारी विभाग व सार्वजनिक क्षेत्र, बँकिंग व फायनान्स, उत्पादन व औद्योगिक क्षेत्र, शिक्षण व प्रशिक्षण संस्था इत्यादी ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
या सर्व अभ्यासक्रमासाठी २२ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत आहे. सुसज्ज कार्यशाळा, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, भरपूर प्रॅक्टिकल्सचा यात समावेश आहे. मागील दहा वर्षात रिगल २ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तरी आपला प्रवेश निश्चित करून आपले उज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन रिगल आयटीआयच्या वतीने करण्यात आले आहे. तरी प्रवेशासाठी किंवा अधिक माहितीसाठी रिगल आयटीआय कोंढे, गुहागर रोड चिपळूण येथे किंवा 8329104876, 7768988584, 9373621950 या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा.