विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहरानजीक भाट्ये येथे दर्गा स्टॉपच्या वळणावर दोन बसची समोरासमोर जोरदार धडक बसून जोरदार भीषण अपघात झाला तर बस मागे असलेल्या क्रेटा कारही बसवर आदळली
यातील एक बस आंबोळगडहून रत्नागिरीच्या दिशेने येत होती
बसमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने होते
काही विद्यार्थी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे
हा अपघात सकाळी ८ ची सुमारास झाला
अपघातानंतर भाट्ये येथील नागरिकांनी पुढे येत जखमी मुलांना बस मधून बाहेर मधून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले
क्रेटा कार ही डॉ गोडसे यांची होती, मुलीला शाळेत सोडण्यासाठी ते जात होते त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे मात्र कार मधील सर्व सुखरूप आहेत
या अपघाताने एकच खळबळ उडाली आहे














