माखजन हायस्कुल मध्ये स्वातंत्र्यदिनी विविध कार्यक्रम

गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व ॲड. पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रम झाले.
यावेळी मुख्याध्यापक महादेव परब यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी कवायती प्रकार सादर केल्या.८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.प्रा संजय सूर्यवंशी यांनी प्रारंभी देशभक्तीपर कविता सादर करत,आपले मौलिक विचार मांडले,मुख्याध्यापक महादेव परब यांनी मनोगतातून,स्वातंत्र्य तर आपण उपभोगत आहोतच ते अबाधित राखून सुराज्या साठी भावी पिढीने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.वातावरण देशभक्तिमय झाले होते.यावेळी खाऊ वाटप झाले.यावेळी कांचन जंगम,रुही पाटणकर,मानसी कोवळे,जगदीश जाधव,हरिश्चंद्र पागडे,सुनील दिंडे,महादेव शिंदे,विठ्ठल भोईर आदिंसह अन्य शिक्षक,विद्यार्थी,पालक उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन रवींद्र पवार यांनी केले.तर आभार अंबादास घाडगे यांनी मानले.