राजापूरातील ज्येष्ठ व्यापारी शंकर कामत यांचे निधन

राजापूर (वार्ताहर): राजापूर शहर बाजारपेठेतील ज्येष्ठ व्यापारी तसेच ‘सन्मित्र टेलरिंग फर्म’ आणि कापड दुकानाचे मालक शंकर कामत यांचे शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी दुपारी रत्नागिरी येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
ते परिचित व ज्येष्ठ व्यापारी म्हणून राजापूरच्या व्यापारी क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या निधनाने व्यापारी वर्गासह राजापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
शंकर कामत यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून राजापूर बाजारपेठेत दीर्घकाळ योगदान दिले. त्यांच्या निधनाने व्यापारी क्षेत्रातील एक ज्येष्ठ व परिचित व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर शनिवार, १५ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी व्यापारी, मित्रपरिवार, नातेवाईक व नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला. राजापूर तालुका व्यापारी संघाच्या वतीने दिवंगत शंकर कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात व्यापारी संघ सहभागी असल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले.