दि. २० ते ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज, ६ सप्टेंबर रोजी परीक्षा
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या शिपाई पदांवर भरतीसाठी सहकार खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सहकार खात्याकडून ३२ रिक्त शिपाई पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार बँकेने कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर या संस्थेची निवड केली असून त्या संस्थेमार्फत भरती प्रक्रिया प्रोसेस सुरू केली आहे.
नोकर भरतीमधील महत्त्वाचे मुद्दे –
१. जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य – यासाठी उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना जिल्ह्यातील रहिवाशी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अपलोड करणे आवश्यक आहे.
२. वयोमर्यादा – किमान २१ व कमाल ४० वर्षे राहील. त्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. ३०/०८/२००५ नंतरचा व दि. ३०/०८/१९८६ यापूर्वीचा नसावा.
३. शैक्षणिक पात्रता – किमान शैक्षणिक १२ वी पास.
४. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी – दि. २०/०८/२०२६ ते दि. ३०/०८/२०२६ पर्यंत.
५. जाहिरात – असोसिएशनच्या http://www.kopbankasso.co.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. २०/०८/२०२६ ते दि. ३०/०८/२०२६ पर्यंत पहावयास उपलब्ध राहील.
६. परिक्षा तारिख – रविवार दि. ०६ सप्टेंबर २०२६.
७. परिक्षा केंद्र – सिंधुदुर्ग.
८. परिक्षे संबंधी माहिती – उमेदवाराला कॉल लेटर इ. माहिती उमेदवाराच्या मेलवर पाठविली जाईल. उमेदवाराने कॉल लेटर डाऊनलोड करून त्याची प्रत काढावयाची आहे. उमेदवार परीक्षा केंद्रावर जाताना परीक्षा कॉल लेटर, सहीत ओळखीसाठी आधारकार्ड/पॅनकार्ड (ओरिजनल) सोबत असणे आवश्यक राहील.
९. परिक्षा निकाल – निकाल जाहीर झालेनंतर त्यामधून गुणानुक्रमे आवश्यक उमेदवारांना तोंडी मुलाखतीस बोलविणेत येईल.
१०.उमेदवारास ऑनलाईन अर्ज भरणे अनुषंगाने काही शंका असल्यास त्यांनी एजन्सीच्या [email protected] या ईमेलवर अथवा ७४९८८५०४२९ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा, असे बँकेने कळविले आहे.













