चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावर्डे येथे हिंदू संमेलन समितीच्या वतीने पंचक्रोशीतील सकल हिंदू समाजाचा भव्य हिंदू मेळावा उद्या आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास पंचक्रोशीतील सर्व हिंदू बांधव-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीतर्फे करण्यात आले आहे.
हा मेळावा उद्या शनिवार दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत पवार सॉ मिल, सावर्डे श्री देव केदारनाथ सहाणे समोर आयोजित करण्यात आला आहे. हिंदू समाजातील एकता, सामाजिक सलोखा, संस्कृतीचे जतन व भावी पिढीपर्यंत सनातन धर्माची मूल्ये पोहोचविण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीने दिली. मेळाव्याचे संयोजक उद्योजक केतन पवार असून प्रमुख अतिथी म्हणून जीवन विद्यामिशन, चिपळूण तालुका शाखाध्यक्ष नंदकिशोर मालेकर उपस्थित राहणार आहेत. तसेच विश्व हिंदू परिषद, उत्तर रत्नागिरी जिल्हा सहमंत्री नितीन सावंत हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. आगवे, डेरवण, कोंडमळा, कुडप, हडकणी आणि सावर्डे पंचक्रोशीतील सर्व हिंदू बांधव-भगिनींनी सहपरिवार उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन सकल हिंदू समाज सावर्डे पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आले आहे.













