
राजापूर | प्रतिनिधी : राजापूर तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष एजाज पन्हळेकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदी राजापुरातील प्रफुल्ल लांजेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर लांजेकर यांची अध्यक्ष्पदी वर्णी लागल्याने रिक्त झालेल्या सचिवपदी सागवे कात्रादेवीसागवे विभागातील व्यावसायिक रमाकांत मोंडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल लांजेकर व मोंडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तालुका केमिस्ट संघटनेची सर्वसाधारण सभा शनिवारी राजापूर येथे यशोदीन मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदीप वळंजू हे होते. या सभेत नवीन अध्यक्ष व सचिवांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी तालुका केमिस्ट संघटनेच्या विविध समस्या व प्रश्नांबाबत चर्चाही करण्यात आली. तर नवीन अध्यक्ष व सचिव यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी बोलताना नुतन अध्यक्ष प्रफुल लांजेकर यांनी आपली अध्ययक्षपदी निवड केल्याबद्दल तालुका केमिस्ट असोशिएशनचे आभार व्यक्त केले. ही नवीन जबाबदारी पार पाडताना तालुका केमिस्ट संघटनेचे प्रश्न मार्गी लावले जातील सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. ज्येष्ठ व्यावसायिक मजिद पन्हळेकर यांनी नुतन पदाधिकारी व संघटनेला शुभेच्छा देत आभार मानले.












