माखजन इंग्लिश स्कूल येथे वृक्षारोपण चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात प्रशालेचा हरितसेना विभाग व सावर्डे येथील शरदचंद्र पवार उदयन विद्या महाविद्यालय खरवते दहिवली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन शरदचंद्र पवार उद्यान विद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी केले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत घाणेकर,सहसचिव दीपक शिगवण,रुपेश गोताड,मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,गणेश शिंदे,आदिंसह उद्यान विद्या महाविद्यालयाचे रंगराज मुडेगोळ,ऋषिकेश जाधव,रितेश सरगर,अफान कन्नी, हुनेन पेटकर आदी विद्यार्थी उपस्थित होते.
उद्यान विद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी,शाळेतील विद्यार्थ्यांना सेंद्रीय खतांबद्दल माहिती दिली.याशिवाय विविध कीटकनाशकांची देखील माहिती दिली.यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.जांभूळ,आवळा अशा विविध झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्यात आली.निबंध व चित्रकला स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्या ना सन्मानित करण्यात आले.हरित सेना विभाग प्रमुख विठ्ठल भोईर यांनी मेहनत घेतली.
यावेळी उद्यान विद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गणेश शिंदे यांनी आभार मानले.