राजापूर प्रतिनिधी : शहरातील मधीलवाडा येथील रहिवशी कलामुद्दीन दाऊद वाडकर वय 75 वर्ष, हे दिनांक रविवार २३ ऑगस्ट पासून नापत्ता आहेत. रविवारी सकाळी घरात कुणालाही काही न सांगता ते घरातुन निघून गेले आहेत.
या प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी राजापूर पोलीस स्थानकात खबर दिली आहे. त्यांच्या हातात काठी, निळी पिशवी आहे. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी नापत्ता अशी नोंद केली आहे. सदर व्यक्ती कोणाला आढळून आल्यास त्यांनी राजापूर पोलीस स्थानक अथवा सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे मोबा.क्रमांक. 9270363328 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.











