श्रीदेव एकमुखी दत्त मंदिर घुडेवठार चवंडेवठार पाटीलवाडी विलणकरवाडी आयोजित

रत्नागिरी :
रत्नागिरी तालुका मर्यादित रिल्स स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत २० रिल्स स्टार्सनी सहभाग घेतला होता. स्पर्धे वेळी मुख्य उपस्थिती प्रसिद्ध फोटोग्राफर श्री कांचन मालगुंडकर यांची लाभली व त्यांनी स्पर्धकांना प्रोत्साहित केले. स्पर्धेचे विजेतेपद सुतेज हरिश्चंद्र चौगुले , उपविजेता सौरभ बने , उत्तेजनार्थ सुरज मस्कर, उत्तेजनार्थ सम्यक मोहिते यांनी पटकावले. यात विशेष उल्लेखनीय बक्षीसामध्ये Highest view बक्षीस चिन्मय साखरकर Highest like बक्षीस ओंकार खेडेकर Unique creator अमृत पेडणेकर तर Best Editor लहान गट शर्वील मुरकर, जिद्नेश शिंदे Best Editor मोठा गट -ओंकार खेडेकर, समर्थ कीर , सुयश जाधव ठरले इतर सर्व सहभागींना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेचे नियोजन सुदेंधू बाबू घुडे, जय बोरकर, आदित्य शिरगावकर , निरंजन फाळके, मानस कीर यांनी केले यामध्ये श्री दत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री मुन्ना चवंडे व उपाध्यक्ष सुमित नागवेकर, विशाल मुडये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रिल्स स्पर्धेचा विषय – हरिनाम सप्ताह माझ्या एकमुखी दत्तांचा हा होता.