मुणगे येथे १ सप्टेंबरला मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर
रिक्षा चालक मालक संघ, मुणगे हायस्कूल तीठा आणि विवेकानंद नेत्रालय व रेटीना सेंटर, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने मुणगे येथे ‘मोफत नेत्र तपासणी शिबिराचे’ आयोजन ०१ सप्टें‍बर
​रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत डॉ. चिन्मय लब्दे, निरामय क्लिनिक, मुणगे हायस्कुल तिठा येथे
करण्यात आले आहे.

​हे शिबीर सर्वांसाठी खुले असून
रुग्णांच्या डोळ्यांची मोफत तपासणी केली जाईल. तसेच डोळ्यांच्या विविध विकारांचे निदान करून योग्य सल्ला दिला जाईल.गरजूंना अल्पदरात चष्मे उपलब्ध करून दिले जातील. लाभ घेण्याचे आवाहन
​रिक्षा चालक मालक संघ, मुणगे हायस्कूल तीठा यांच्या वतीने करण्यात आले आहे.