मंत्री नितेश राणे, आ. प्रमोद जठार यांसह मान्यवरांची उपस्थिती
राजापूर (प्रतिनिधी): श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भारतीय जनता पक्ष, राजापूरच्या वतीने रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जवाहर चौकात सायंकाळी ४ ते रात्री ९ या कालावधीत हा दहीहंडी उत्सव होणार आहे.
या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे, आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सतीश मोरे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
दहीहंडी उत्सवात सुमारे एक लाखाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गोविंदा पथकांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार पाहण्याची संधी राजापूरवासीयांना मिळणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजपचे जिल्हा, मंडळ तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या दहीहंडी उत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस अभिजित गुरव, तालुका अध्यक्ष मोहन घुमे, एड. एकनाथ मोंडे, शहर प्रमुख सुशांत मराठे यांनी केले आहे.












