पाचलमध्ये शनिवारी दहीहंडी उत्सव आणि रस्सीखेच स्पर्धेचा थरार

पाचल (वार्ताहर): पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दहीहंडी उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव रविवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पाचल बाजारपेठ, वैभव हॉटेल समोर होणार आहे.
यंदा दहीहंडी सोबतच भव्य रस्सी खेच स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. “चला तर मग… जोर लावूया आपल्या गावची ताकद दाखवूया!” या घोषवाक्यासह सकाळी १० वाजता रस्सी खेच स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दुपारी १२ वाजता गोविंदा पथकांच्या दहीहंडी स्पर्धेला सुरुवात होईल.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, शिवसेना युवानेत्या अपूर्वा किरण सामंत उपस्थित राहणार आहेत. तसेच पाचलचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, माजी उपसरपंच किशोर नारकर, व्यापारी संघटनेचे शंकर पाथरे, जि. प. सदस्य सिद्धली मोरे, पं. स. सदस्य अपेक्षा मासये, समिक्षा वाफेलकर आणि माजी सरपंच अशोक सक्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा उत्सव साजरा होणार असून सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाने केले आहे.