माणसांमध्ये देव शोधा आणि त्यांची सेवा करा: प. पू. सद्गुरू गावडे काका महाराज

​श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे प. पू. गावडे काका महाराजांचे अध्यात्मिक मार्गदर्शन

मसुरे | झुंजार पेडणेकर देव विकत घेता येत नाही, तो भावाचा भुकेला आहे. माणसांमध्ये देव शोधा आणि त्यांची सेवा करा.नामस्मरणातूनच माणसाची आंतरिक ऊर्जा वाढते आणि मनाला खरी शांती मिळते.अज्ञानाचा अंधकार दूर करून जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य घडवून आणणारा मार्ग म्हणजे सद्गुरूंची कृपा होय.सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, लोभ आणि अहंकार सोडा, तीच खरी ईश्वराची सेवा ठरेल असे प्रतिपादन प पु गावडेकाका महाराज यानी येथे केले. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. मसदे वडाचापाट येथील हाच मठ येत्या काळात भव्य दिव्य पद्धतीने उभा राहणार आहे. नवीन उभारणीमध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. तुमची आपुलकी आणि विश्वास भरपूर असल्याने स्वामींचे आशीर्वाद निश्चितच तुम्हाला लाभणार आहेत. कष्टाला आणि सत्कर्माला अध्यात्माची जोड दिल्यास आयुष्यात खरा आनंद मिळतो असेही श्री गावडे काका महाराज म्हणाले. यावेळी प्रस्तावना करताना माजी अध्यक्ष श्रीकृष्ण पाटकर म्हणाले, परमपूज्य गावडे काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मठाची वाटचाल चालू असून भाविकांना या ठिकाणी सुविधा मिळाव्यात यासाठी वेगवेगळे उपक्रम भविष्यात राबविण्यात येणार आहेत. सुलभ शौचालय तसेच भक्तनिवास उभारण्याचा विचार आगामी काळात पूर्णत्वास जाणार आहे. सर्वांच्या सहकार्यातून हे काम सुद्धा यशस्वी होईल. मठासाठी नव्याने जागा दिल्याबद्दल जमीन मालकांचे आभार यावेळी त्यांनी मानले. यावेळी माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, पोलीस प्रजोत वानिवडेकर, योग प्रशिक्षक सौ केसर वानिवडेकर, विश्वस्त देविदास रेडकर, सेवानिवृत विस्तार अधिकारी अंकुश मुणगेकर, समाजसेवक गोपीनाथ पालव, भाऊ तांडेल, साई पेडणेकर, सुधीर पडेलकर,गौतम खोत, रसिका हिवाळेकर, सुनील गावडे,कोमल पेडणेकर, संतोष मसुरकर, कल्पना मठकर, बंटी परब,शिवाजी बागवे,बाबु पोयरेकर,अनिल पोयरेकर, संदीप नामनाईक, पुंडलिक जाधव, उमेश मुणगेकर, अमृता पाटकर, संतोष हिवाळेकर आदी उपस्थित होते. आभार श्रीकृष्ण पाटकर यानी मानले.