महादेव अण्णा चव्हाण यांना जीवन गौरव, रघुनाथ बापू पवार यांना समाजभूषण पुरस्कार
खेड (प्रतिनिधी) : श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त खेड तालुका नाभिक समाज संघटना आणि श्री संत सेना नाभिक पतसंस्था, भरणे-खेड यांच्या संयुक्त विद्यमाने भरणे येथील श्री संत सेना महाराज सभागृहात मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समाजासाठी प्रदीर्घ काळ निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाजबांधवांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
सुकिवली येथील ज्येष्ठ समाजबांधव श्री. महादेव अण्णा चव्हाण यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल ‘खेड तालुका नाभिक समाज जीवन गौरव पुरस्कार’, तर फुरूस येथील श्री. रघुनाथ बापू पवार यांना ‘खेड तालुका नाभिक समाज समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. अरुण उर्फ अण्णा कदम यांच्या शुभहस्ते हे दोन्ही मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
समाजासाठी आयुष्यभर निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाजबांधवांचा गौरव हा त्यांच्या कार्याची समाजाकडून घेतलेली पोचपावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ज्येष्ठांच्या सामाजिक कार्यातून समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळते आणि समाजाची एकजूट अधिक बळकट होते, असा संदेशही या सोहळ्यातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला खेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री. अजय माने, भरणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. संतोष गोवळकर, खेड तालुका नाभिक समाज संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. संजय पवार यांच्यासह श्री. रघुनाथ पवार, श्री. सिताराम राऊत, श्री. दीपक माने, श्री. शामसुंदर दळवी, श्री. महादेव धा. चव्हाण उपस्थित होते.
खेड तालुका नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष श्री. अमर अनंत दळवी, सचिव श्री. नितीन सुरेश साळुंखे, सहसचिव श्री. समीर राजाराम पवार, सल्लागार श्री. प्रशांत दळवी, उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, महिला मंडळाच्या पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. श्री संतसेना नाभिक पतसंस्थेचे संचालक आणि कर्मचारीवर्गानेही कार्यक्रमाला उपस्थित राहून गौरव सोहळ्याची शोभा वाढवली.
श्री. महादेव अण्णा चव्हाण आणि श्री. रघुनाथ बापू पवार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात आले. समाजसेवेचा सन्मान, ज्येष्ठांच्या कार्याला सलाम आणि समाजाच्या एकजुटीला मानाचा मुजरा देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.













