सौ क्षितिजा आगाशे पटवर्धन ह्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

गौरव पोंक्षे माखजन:
पुणे येथे जाधवार ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूट च्या पॅराडाइज ज्युनिअर कॉलेज मध्ये जीवाशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका सौ क्षितिजा आगाशे पटवर्धन ह्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.मूळ गुहागर च्या असलेल्या क्षितिजा ह्या डॉ.संजय आगाशे यांची मुलगी आहे.
शैक्षणिक क्षेत्रात विशेषतः अध्यापनात लक्षवेधी कामकाज केल्यामुळे संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार क्षितिजा आगाशे पटवर्धन यांना बहाल केला.
सौ क्षितिजा ह्या चिपळूण च्या डी.बी.जे कॉलेज च्या विद्यार्थिनी आहेत.व त्यांनी मास्टर डिग्री रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पूर्ण केले.
त्यांना शिक्षण तज्ञ विवेक वेलणकर यांच्या हस्ते,संस्थेच्या पुणे येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात,सौ क्षितिजा यांना सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला यावेळी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष, डॉ सुधाकराव जाधवर, उपाध्यक्ष ॲड.शार्दुल सुधाकराव जाधवर आणि खजिनदार सौ सुरेखा सुधाकरराव जाधवर उपस्थित होते.
सौ क्षितिजा आगाशे पटवर्धन हिला पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.