BREAKING NEWS : रत्नागिरीत २ किलो १०० ग्रॅम गांजासह संशयित गजाआड; १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!

रत्नागिरी : दुर्गेश पिलणकर 

  • रत्नागिरी शहरातील काजरघाटी धार परिसरात संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

  • रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (DB) सापळा रचून एका संशयित इसमाला अटक केली.

  • कारवाईदरम्यान २ किलो १०० ग्रॅम गांजासह एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • ही यशस्वी मोहीम पोलीस उपअधीक्षक आरांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबवली गेली.

  • अवैध अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी घेतलेल्या या धडक भूमिकेमुळे परिसरातील ड्रग्ज तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.