मसुरे | झुंजार पेडणेकर : चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर सुकळवाड पाताडेवाडी येथील वातावरण पूर्णपणे गणेशमय झाले होते.
अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावात बाप्पाची सेवा केल्यानंतर येथील गणेशभक्तांनी मंगळवारी उत्तरपूजा आटपून दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुतिने अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने, फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत स्थानिक गणेशकोंड स्थळावर बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
वाडीतील आबालवृद्धांनी एकत्र येत “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणा देत बाप्पाला निरोप दिला.
बाप्पाला निरोप देताना अशोक पाताडे, मुकेश पाताडे, एकनाथ पाताडे, वासुदेव पाताडे, संजय पाताडे व आनंद पाताडे आणि कुटुंबिय उपस्थित होते.











