मसुरे | झुंजार पेडणेकर : वायंगवडे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी गावचे माजी सरपंच जयवंत रामचंद्र परब यांची सलग तिसऱ्यादा गावच्या ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान परब यांचे आहे. गावच्या देवस्थान समितीचे ते दोन वर्ष अध्यक्ष आणि ओवळीये दशक्रोशी जेष्ठ नागरिक सेवा संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. मुंबई मध्ये त्यांनी कामगार सेनेचे प्रतिनिधित्व केले होते. आपल्या सरपंचपदाच्या आणि सार्वजनिक जीवनाच्या काळात त्यांनी नेहमीच गावच्या विकासाचा ध्यास घेऊन काम केले आहे. गावात आपापसातील वाद सामोपचाराने मिटवून शांतता व सुव्यवस्था राखण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.
परब यांच्या या हॅटट्रिक निवडीबद्दल आणि त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक योगदानाबद्दल ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि दशक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












