‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून सेवा संकल्प दृढ

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चरणी दीप प्रज्वलित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य

भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित

मालवण | प्रतिनिधी : आपल्या भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मालवणात ‘आशीर्वादाचा दिवा – एक दीप सेवा संकल्पाच्या नावे’ हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राजकोट येथे गुरुवारी सायंकाळी दीप प्रज्वलित करून सेवा, सुशासन, गरीब कल्याण आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प करण्यात आला. यावेळी भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

‘सेवेची २५ वर्षे, सुशासन, गरीब कल्याण आणि राष्ट्रनिर्माण’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ‘विकसित भारताचा’ संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी मालवण शहर प्रभारी पंकज सादये, महिला मोर्चा शहरअध्यक्ष तथा नगरपरिषद महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, नगरसेवक मंदार केणी, नगरसेवक विकी तोरसकर आणि युवा मोर्चा अध्यक्ष ललित चव्हाण, महिला पदाधिकारी महिमा मयेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर सेवा कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संकल्प करण्यात आला.