पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांचा असाही आदर्श

तोंडवळी मुंजाचे बाग येथ उभारला स्वखर्चातून साकव 

आचरा-अर्जुन बापर्डेकर

 

तोंडवळी मुंजाचे बाग येथे साकव नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत होते. लोकांची गरज ओळखून मालवण पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून साकव उभारून सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.गुरुवारी गणेश तोंडवळकर यांच्या हस्ते साकवाचे लोकार्पण झाले

या साकवामुळे ग्रामस्थांची ये-जा करणे सुकर होणार असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या लोकार्पण सोहळ्यावेळी माजी सरपंच

राजन वराडकर प्रसाद मसुरकर

प्रमोद ताडेल,सचिन बागवे,रामजी बागवे ,मंगेश ताडेल तेजू पोयरेकर

सर्वेश पेडणेकर

पोयरेकर,मुंज वहिनी

महाकाळ ,तसेच मुंबईतील सर्व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.

 

मुजाचे बाग वाडीतील साकव बनवणे याभागातिल ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते.

रेशन दुकानावर जाणाऱ्या लोकांसाठी तसेच गणपती उत्सवासाठी आलेल्या लोकांना ये जा करण्यासाठी साकवाची आवश्यकता होती.तसेच

गणपती मध्ये सर्व लोकांना रात्री च्या वेळीआरतीला जाण्यासाठी भरपूर त्रास सहन करावा लागत होता तेथील ग्रामस्थांनी आपल्या व्यथा पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांच्या कडे व्यक्त केल्या आणि तोंडवळकर यांनी गणपतीच्या अगोदर साकव बांधून देण्याचा शब्द दिला.आपल्या लोकांसाठी शासकीय निधीची वाट न बघता

तोंडवळकर यांनी तातडीने स्वखर्चाने साकव बांधून देत ग्रामस्थांची गैरसोय दूर केली.

गावातील गरजा लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे, हीच खरी सामाजिक सेवा आहे. याच भावनेतून गणेश तोंडवळकर यांनी स्वखर्चातून साकव उभारला त्यांच्या या कार्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत गणेश तोंडवळकर यांचे कौतुक केले जात आहे.