अनोळखी महिलेचा मृतदेह मालवण बंदर जेटी किनारी सापडला 

मालवण | प्रतिनिधी : मालवण बंदर जेटी परिसरात रविवारी सकाळी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पुढील कार्यवाही व तपास सुरू आहे.