संगमेश्वर चिपळूण भागात धूसर वातावरण

गौरव पोंक्षे माखजन:
सोमवारी सकाळपासून संगमेश्वर व चिपळूण तालुक्यात धूसर वातावरण पहायला मिळत आहे.सकाळच्या वेळेस नागरिकांना धूके असल्याचे जाणवले.परंतु दिवस जसा जसा पुढे सरकला त्यावेळी वातावरणच प्रदूषित धुसर असल्याचे स्पष्ट झाले.
मुंबई पुणे दिल्ली अशा शहरात अशी अनेकदा परिस्थिती पाहायला मिळते.वातावरणातील प्रदूषकांची संख्या वाढली की अशी धूसर परिस्थिती पहायला मिळते.मुंबई दिल्ली सारख्या शहरांमध्ये ठराविक काळासाठी बांधकामे थांबवली जातात.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणकणात वाहनांची संख्या कैक पटीने वाढली होती.याचा परिणाम देखील हवेमध्ये पाहायला मिळू शकतो.
धूसर वातावरणामुळे सर्दी खोकला असे साथीचे आजार वाढण्याची शक्यता दाट असते.धुसर वातावरणा मुळे दृश्यमानता देखील कमी झालेली पाहायला मिळाली.दूरचे डोंगर दिसेनासे झाले आहेत.हे धुसर वातावरण किती काळ टिकते हे पाहावे लागेल.