01 ते 15 नोव्हेंबर, 2026 या कालावधीत जन जातीय गौरव दिवस

रत्नागिरी:
केंद्र सरकारने भगवान विरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त व आदिवासी समुदायांच्या ऐतिहासिक योगदानाचा सन्मान करण्यासाठी दि. 1 ते 15 नोव्हेंबर, 2026 या कालावधी दरम्यान देशभरात जन जातीय गौरव दिवस साजरा करणेबाबत सुचित केले आहे. अभियानामध्ये Whole of Government and Whole of India या दृष्टीकोनातुन सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, आदिवासी वस्त्यांमध्ये ग्रामीण पिण्याच्या पाण्याच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे उदघाटन किंवा भूमिपूजन करणे. वैयक्तिक कुटुंब नळ जोडणी (FHTCs) वितरीत करणे व सुरक्षित पिण्याचे पाणी आणि पाणी गुणवत्ता तपासणी याबाबत जनजागृती मोहीम राबविणे. ग्राम पाणी व स्वच्छता समिती (VWSC), पाणी समिती व आदिवासी युवक, महिला यांच्यासाठी संचालन व देखभाल (O&M) या बाबत गावस्तरावर प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रम आयोजित करणे.
जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या जनजातीय गौरव पंधरवड्यात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.वैदेही रानडे यांनी केले.