जयगड-सडेवाडीत टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने ९३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील जयगड-सडेवाडी येथे टिव्ही पहाण्याच्या बहाण्याने आलेल्या प्रौढाने कपाटातील तब्बल 93 हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले. ही घटना 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 ते 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा.कालावधीत घडली आहे.
निलेश नारायण पाटील (45,मुळ रा.कोळंबे सध्या रा.जयगड सडेवाडी,रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात तेजस्विनी संकेत वाघधरे (35,रा.सडेवाडी जयगड,रत्‍नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, संशयित हा फिर्यादीच्या घरी टिव्ही पहाण्यासाठी येत होता. त्‍या कालावधी त्‍याने फिर्यादीच्या नकळत तिच्या कपाटातील बॉक्समध्ये ठेवेलेल्या सोन्याच्या कुडी,सोन्याच्या पट्टया, सोन्याचे लॉकेट,दोन सोन्याच्या चेन,एक सोन्याची अंगठी,लहान मुलांची कानातील रिंग,सोन्याची नथ असा एकूण 92 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.