कणकवली येथे २७ रोजी शिवसेनेच्यावतीने नारळ लढविणे स्पर्धा.!

स्पर्धेत सहभागी होण्याचे भूषण परुळेकर यांचे आवाहन.!

कणकवली : शिवसेना तालुका कणकवली व कणकवली शहर शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय महिला गट व पुरुष गट नारळ लढविणे स्पर्धा रविवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक : ५०००/- रुपये, द्वितीय पारितोषिक : ३०००/-,तृतीय पारितोषिक : २०००/- ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. महिला गट साठी मोफत प्रवेश व पुरुष गट १००/- रुपये फी आहे. आयोजकांनी उपलब्ध केलेला नारळ स्पर्धकांनी वापरायचा आहे. सर्धेसाठी नाव नोंदणी संपर्क : १) प्रशांत वनस्कर 9404921921,

२) विश्राम सावंत : 7588459818

3) प्रिया टेंबकर : 9403066186

४) श्रेया टकले : 9096953371 यांच्याकडे नावे नोंदवावीत व स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुका कणकवली यांच्यामार्फत करण्यात आले आहे.