रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील वाटद परटवणे येथे बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या महिलेविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.50 वा.सुमारास करण्यात आली आहे.
शलाका शंकर रहाटे (55,रा.वाटद परटवणे, तेलीवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल संतोष शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी संशयित महिला बेकायदेरिपणे आपल्या ताब्यात 505 रुपयांची 5 लिटर गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. तिच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










