शनिवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी बेंजोच्या तालावर नाचत बेनी नदीपात्रामध्ये गणेशाचे विसर्जन
ला़ंजा (प्रतिनिधी) लांजा पोलिस ठाण्याच्या गणपती बाप्पाला शनिवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी भावपूर्ण निरोप देण्यात आला. लांजा पोलिस ठाण्यापासून मिरवणुक काढत , बेंजोच्या तालावर नाचत बेनी नदीत बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
लांजा पोलीस ठाण्याच्या आवारात असणाऱ्या महापुरुष मंदिरात या गणेशाची स्थापना करण्यात येते. या बाप्पांच्या आगमनानंतर लांजा पोलिसांच्या वतीने गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी
२५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी तालुक्यातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे विसर्जन करण्यात आले होते. या दिवशी पोलिस, बंदोबस्तासाठी असल्याने लांजा पोलिस ठाण्याच्या गणपतीचे शनिवारी २६ सप्टेंबर रोजी भावपूर्ण वातावरणात गणेशाचे विसर्जन करण्यात आले.
सायंकाळी लांजा पोलिस पाण्यापासून बेंजोच्या तालावर लांजा बाजारपेठेतुन मिरवणुक काढण्यात आली. तत्पूर्वी गणपती बाप्पावर पोलीस आणि होमगार्ड यांच्या कडून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्या नंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पोलिस कर्मचारी यांनी ठेका धरला होता. फटक्यांची आतषबाजी व बापाच्या जयघोष करत ही मिरवणुक काढण्यात आली. यावेळी पोलिसांचे कुटुंबीय या गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते .
सायंकाळी उशीरा बेनी नदीपात्रात या गणेशाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.












