जनतेच्या संकटात धावून जाणारे नेतृत्त्व! 

▪️राणे परिवाराची तत्परता आणि विकासाची कटिबद्धता

झुंजार पेडणेकर (मसुरे) सिंधुदुर्ग जिल्ह्यावर जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट आले किंवा शेतकरी, कष्टकरी अडी अडचणीत सापडला, तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा राणे परिवाराने नेहमीच जपली आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सुरू केलेला हा जनतेच्या सेवेचा वारसा आज राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे ‘पालक ‘मंत्री नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे अत्यंत समर्थपणे पुढे चालवत आहेत.दुष्काळ आणि संकटाच्या काळात थेट बांधावर पोहोचत शेतकऱ्यांना धीर देत जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात येईल असा विश्वास सरकार म्हणून नाम. नितेश राणे, आम. निलेश राणे शेतकऱ्यांना देत आहेत. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुके ‘ट्रिगर १’ मध्ये समाविष्ट करून घेण्यामध्ये उच्च पातळीवर पाठपुरावा आणि राजकीय वजनाचा मोठा वाटा दिसून आला आहे. त्याचप्रमाणे भात शेतीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देतानाच पुढील दिवसात पाणीटंचाई जाणवणार असल्याने यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश सुद्धा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.

▪️राणे बंधू शेतकऱ्यांच्या बांधावर –

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पेरणी केली, लावणी पूर्ण झाली, मात्र भात पीक एन पोटरीवर येण्याच्या वेळी पावसाने मारलेली दडी शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक ठरली. दाणे न भरताच भाताची केसर डोलू लागली—ज्याला ग्रामीण भाषेत ‘भात चिम होणे’ म्हटले जाते. हाताशी आलेला घास हिरावल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी कुठलाही विलंब न करता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली.

▪️आपुलकीची साथ आणि प्रशासनाला कडक सूचना-

केवळ आश्वासने न देता, प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना धीर देणे आणि “आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” हा विश्वास देणे, यातून राणे परिवाराची जनतेबद्दलची गाढ आपुलकी दिसून येते. संकटाच्या या गांभीर्याची जाणीव ठेवून त्यांनी प्रशासनालाही कडक सूचना दिल्या आहेत. वस्तूनिष्ठ पंचनामे जलद गतीने करून त्यांना योग्य ती मदत वेळेत मिळावी यासाठी शासकीय यंत्रणेला गतिमान करण्यात आले आहे. कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा कोणतीही हयगय सहन केली जाणार नसल्याच्या सूचना कडक शब्दात त्यांनी दिल्या आहेत.

▪️वारसा जनसेवेचा आणि विकासाचा-

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी नेहमीच कोकणातील शेतकरी, मच्छीमार, पूरग्रस्त आणि बागायतदारांच्या हक्कासाठी पुढाकार घेतला आहे. तीच संवेदनशील वृत्ती आणि प्रशासकीय पकड आज नाम.नितेश राणे आणि आम. निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीत पाहायला मिळत आहे.आपत्कालीन नियोजनापासून ते प्रत्यक्ष मदतीपर्यंत, राणे परिवार जिल्ह्याच्या पाठीशी एक संरक्षक ढाल बनून उभा आहे. संकटाच्या काळात जनतेच्या डोळ्यांतील अश्रू पुसून त्यांना पुन्हा उभे राहाण्याची ताकद देणारे हे नेतृत्त्व भविष्यातही जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनसेवेसाठी असेच कटिबद्ध राहील असा विश्वास सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे.

▪️जिल्ह्यात 48,716.33 हेक्टर क्षेत्रामध्ये भात लावणी –

चालू खरीप हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 4982.19 हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली होती यामध्ये हळवे 1035.50, निमगरवे 1931.46 आणि गरवे 2016. 03 हेक्टर क्षेत्रा मध्ये पेरणी करण्यात आली होती. तर भात लावणीचे एकूण क्षेत्र 48,716.33 हेक्टर इतके आहे. यामध्ये हळवे जातीची भात लावणी 10378.57 हेक्टर , निमगरवे 18921.61 हेक्टर, आणि गरवे 19416.15 हेक्टर मध्ये लावणी करण्यात आली आहे. सर्वाधिक लावणी क्षेत्र कुडाळ तालुक्यात 11938.19 हेक्टर, कणकवली तालुक्यात 11 015.53 हेक्टर, तर तृतीय क्रमांकावर मालवण तालुक्यात 8063.30 हेक्टर क्षेत्रावर लावणी करण्यात आली आहे तर रहू लावणीचे क्षेत्र 7.45 हेक्टर आहे. पावसा अभावी 90 टक्के क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र बाधित असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे.

 

▪️जिल्ह्यात आंबा व काजू पीक नुकसान भरपाई निधी वितरणाला गती –

कॅबिनेट बैठकीत पालकमंत्री नितेश राणे आणि अधिवेशनात आमदार निलेश राणे यानी आवाज उठवत जिल्ह्यातील आंबा आणि काजू शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नुकसानी मिळवून दिली आहे. बऱ्याच वर्षांनी अशी मदत शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे.

जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता, ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकूण ७९ कोटी ३४ लाख ५६ हजार ६७७ रुपये अपेक्षित निधी निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी ई-पंचनामा पोर्टलवर ३४ हजार ९३३ लाभार्थ्यांसाठी ७६ कोटी ६ लाख ८० हजार १०१.७४ रुपये मंजूर झाले आहेत. दि. २४ सप्टेंबर २०२६ अखेर २६ हजार ६१२ लाभार्थ्यांना ५९ कोटी २३ लाख ४५ हजार ९४५ रुपये नुकसान भरपाई वितरित झाली आहे.

मंजूर निधीच्या रकमेनुसार देवगड तालुक्यासाठी सर्वाधिक २० कोटी ७७ लाख रुपये मंजूर झाले असून, त्यापैकी १४ कोटी २१ लाख रुपये निधी वितरित झाला आहे. त्यानंतर कुडाळ तालुक्यात मंजूर १२ कोटी २५ लाख ७५ हजार ७२५ रुपयांपैकी १० कोटी ९२ लाख ७० हजार २७५ रुपये निधी वितरित झाला आहे. मालवण तालुक्यात मंजूर १० कोटी २९ लाख ८१ हजार २८३ रुपयांपैकी ७ कोटी ५० लाख १४ हजार ५४८ रुपये, तर सावंतवाडी तालुक्यात मंजूर ९ कोटी ८८ लाख २२ हजार ५१५ रुपयांपैकी ८ कोटी २८ लाख ५४ हजार ४१५ रुपये निधी वितरित झाला आहे.

वेंगुर्ला तालुक्यात मंजूर ६ कोटी ८७ लाख ६३ हजार ८३५ रुपयांपैकी ४ कोटी ७८ लाख ३५ हजार ६० रुपये, कणकवली तालुक्यात मंजूर ६ कोटी ५४ लाख ९१ हजार ६५० रुपयांपैकी ५ कोटी ८२ लाख ३३ हजार ७१८ रुपये, दोडामार्ग तालुक्यात मंजूर ५ कोटी ६७ लाख ६० हजार ७०० रुपयांपैकी ४ कोटी ४० लाख ६३ हजार ६७५ रुपये, तर वैभववाडी तालुक्यात मंजूर ३ कोटी ७५ लाख ८२ हजार ५७६ रुपयांपैकी ३ कोटी २९ लाख २० हजार २२६ रुपये निधी वितरित झाला आहे. जास्तीची आंबा, काजू नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यामध्ये सर्व श्रेय पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचेच असल्याचे नुकसान भरपाईची आकडेवारी पाहता दिसून येत आहे.