अस्नोटी–कारवार दरम्यान ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक
कारवार–मडगावदरम्यान काही गाड्या अंशतः रद्द; काही गाड्या कारवारपर्यंतच धावणार, तर काही गाड्यांना विलंब
कोकण रेल्वे : अस्नोटी–कारवार दरम्यान १ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ट्रॅफिक व पॉवर ब्लॉकची कामे करण्यात येणार आहेत. या कामांचा परिणाम काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर होणार असून, काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, काही गाड्यांना मार्गात नियमन करून विलंबाने धाववण्यात येणार आहे. याबाबत कोकण रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
मंगळुरू–मडगाव एक्स्प्रेस कारवारपर्यंतच धावणार
गाडी क्रमांक ५६६१६ मंगळुरू सेंट्रल–मडगाव जंक्शन एक्स्प्रेस ही गाडी १, ८ आणि १५ ऑक्टोबर २०२६ रोजी कारवार येथेच थांबवण्यात येणार आहे. या दिवशी कारवार ते मडगाव जंक्शनदरम्यानचा प्रवास अंशतः रद्द करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ५६६१५ मडगाव जंक्शन–मंगळुरू सेंट्रल एक्स्प्रेस ही गाडी १, ८ आणि १५ ऑक्टोबर रोजी नियोजित वेळेनुसार एक्स-कारवार येथून सुटणार आहे. त्यामुळे या दिवशी मडगाव जंक्शन ते कारवारदरम्यानची सेवा अंशतः रद्द राहणार आहे.
काही गाड्यांना उशिराने प्रस्थान
गाडी क्रमांक ५६६१५ मडगाव जंक्शन–मंगळुरू सेंट्रल एक्स्प्रेसच्या वेळेतही काही दिवस बदल करण्यात आला आहे.
२, ४, ९, ११, १६ आणि १८ ऑक्टोबर २०२६ रोजी ही गाडी मडगाव जंक्शन येथून ९० मिनिटे उशिराने सुटणार आहे.
तसेच ६, १३ आणि २० ऑक्टोबर २०२६ रोजी या गाडीला १६० मिनिटांचा विलंब होणार असून, ती मडगाव जंक्शन येथून उशिराने रवाना केली जाणार आहे.
सुरत–मंगळुरू एक्स्प्रेसचे नियमन
गाडी क्रमांक १९०५७ सुरत–मंगळुरू जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस ही गाडी ७ आणि १४ ऑक्टोबर २०२६ रोजी मडगाव जंक्शन–कानाकोना दरम्यान २५ मिनिटांसाठी नियमन करण्यात येणार आहे.
एर्नाकुलम–पुणे एक्स्प्रेसला १४० मिनिटांचा विलंब
गाडी क्रमांक २२१४९ एर्नाकुलम जंक्शन–पुणे एक्स्प्रेस ही गाडी २, ९ आणि १६ ऑक्टोबर २०२६ रोजी कुंडापुरा–कारवारदरम्यान १४० मिनिटांसाठी नियमन करण्यात येणार आहे.
यामुळे या गाडीच्या प्रवासाला संबंधित दिवशी अतिरिक्त वेळ लागू शकतो.
पुणे–एर्नाकुलम एक्स्प्रेसचेही नियमन
गाडी क्रमांक ११०९७ पुणे–एर्नाकुलम जंक्शन एक्स्प्रेस ही गाडी ४, ११ आणि १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मडगाव जंक्शन–कारवारदरम्यान १४० मिनिटांसाठी नियमन करण्यात येणार आहे.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन
अस्नोटी–कारवारदरम्यान होणाऱ्या ट्रॅफिक व पॉवर ब्लॉकच्या कामामुळे संबंधित दिवशी गाड्यांच्या प्रवासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे १ ते २० ऑक्टोबरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि सेवा उपलब्धता तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












