बस मेकॅनिक संतोष कदम यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) चिपळूण आगारातील बस मॅकेनिक संतोष सिताराम कदम हे तब्बल ३७ वर्षे ७ महिने प्रदीर्घ सेवा बजावून दि. ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने चिपळूण आगारात अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्तीपर शुभेच्छा देण्यात आल्या.
संतोष कदम यांनी एस.टी. महामंडळाच्या सेवेत दि. ११ मार्च १९८९ रोजी बस मॅकेनिक म्हणून नियुक्ती स्वीकारली. त्यानंतर तब्बल तीन दशके सातत्याने सेवा बजावत त्यांनी चिपळूण आगारातील एस्टी बसच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी अधिकारी तसेच सहकाऱ्यांसोबत समन्वयाने चिपळूण बस स्थानकात सेवानिवृत्त कर्मचारी संतोष कदम यांचा सन्मान करताना मान्यवर. काम करीत आगाराच्या दैनंदिन कामकाजात मोलाची भूमिका बजाविली. त्यांच्या सेवानिवृत्तीपर शुभेच्छा कार्यक्रमास त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा कदम तसेच मुलगी जुई कदम यांच्यासह चिपळूण आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी संतोष कदम यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील योगदानाचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संतोष कदम यांनी मनोगतात आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत अधिकारी व कर्मचारी वर्गाने वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.