रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील गोळप-शिरंबाडवाडी येथील प्रौढाने कोणत्यातरी अज्ञात कारणातून विषारी किटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
दिपक भिकाजी घाणेकर (५२, रा. गोळप शिरंबाडवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना २८ सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास घडली. दिपक घाणेकर हे दारु पिवून घरी आले व अडगळीच्या खोलीत खॉटवर झोपले होते. त्यांचा मुलगा जेवणासाठी बोलविण्यासाठी गेला असता त्याला खोलीत उलट्या केलेल्या दिसल्या त्यामुळे त्याने अडगळीत शोध घेतला असता त्याला अडगळीच्या खोलीत ठेवलेली किटकनाशकाची बाटली दिसली. त्याने तातडीने वडिलांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पुर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











