दिवसातील एक तास शरीराला द्या -अमित कदम
आचरा-अर्जुन बापर्डेकर
शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे.दिवसातील निदान एक तास जरी शरीराला दिलात तर आरोग्यासाठी उत्तम असल्याचे मत आंतरराष्ट्रीय स्तरावर शरीरसौष्ठव स्पर्धेत यश संपादन केलेला न्यू इंग्लिश स्कूल आचराचा माजी विद्यार्थी अमित अनिल कदम यांनी व्यक्त केले.
बॅंकॉंक येथे झालेल्या प्रतिष्ठित मिस्टर युनिव्हर्सल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत पदक विजेते अमित कदम यांचा न्यू इंग्लिश स्कूल आचरा तर्फे स्थानिक स्कूल समिती अध्यक्ष जे एम फर्नांडिस यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी समिती सदस्य राजन पांगे,बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे,यांसह अन्य शिक्षक विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे प्रदान करण्यात येणारा गुरुसेवा पुरस्कार २०२६’ प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. मधुरा माणगावकर यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच ‘चला शाळेकडे जाऊया’ या अभियानांतर्गत विशेष योगदान दिल्याबद्दल केंद्रशाळा आचरा नं. १ चे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साटेलकर सर यांनी केले, तर सौ. कदम मॅडम यांनी आभार मानले.













