वेंगुर्ले येथे मोफत आरोग्य शिबिरात ७६ रुग्णांची मोफत तपासणी…

वेंगुर्ले : प्रतिनिधीआरोग्यसेवा हीच खऱ्या अर्थाने जनसेवा आहे, निरोगी समाज हा देशाच्या प्रगतीचा पाया असून आरोग्याची काळजी घेणे, आजारांवर वेळीच उपचार मिळणे आणि प्रत्येकापर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचवणे हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे असे प्रतिपादन वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील डुबळे यांनी केले. वेंगुर्ले सप्तसागर काॅम्पेक्स येथे धन्वंतरी क्लिनिक व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या आरोग्य शिबिरात ७६ रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत औषधउपचार करण्यात आला.

यावेळी धन्वंतरी क्लिनिकच्या डॉ. सई लिंगवत, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, जनरल फिजिशीयन डॉ. संजीवनी लंबे, दंतरोग चिकित्सक डॉ. किशोर धोंड , वैद्यकीय परिचारिका अश्विनी किनळेकर, शेजल गावडे, स्मिता मेस्त्री उपस्थित होत्या. मोफत आरोग्य शिबिरात ७६ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. या शिबिरात डॉ. सई लिंगवत, जनरल फिजीशियन डॉ. संजीवनी लंबे, दंतरोग चिकित्सक डॉ. किशोर धोंड, नाक कान घसा तज्ञ डॉ.जेरोनिमा डिसोझा, डॉ नयनेश गावडे, होमिओपॅथिक तज्ञ डॉ. संजीव लिंगवत यांनी रुग्णांची तपासणी केली तर प्रयोग शाळा तंत्रज्ञ अश्विनी किनळेकर यांनी रक्त शर्करा, थाईराईड आदी तपासण्या मोफत केल्या. कार्यक्रमाचे स्वागत प्रसाद हरमलकर यांनी प्रास्ताविक शुभम मल्हार यांनी तर आभार प्रदर्शन पल्लवी सावंत, रमणी लिंगवत यांनी केले.