स्मिता माने प्रकारणात पती सचिन माने याच्या अडचणींत वाढ

कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार स्मिता माने यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. स्मिता यांच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पती पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मिता यांना पतीकडून शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा तसेच त्यांच्या मृत्यूमागे घातपात असण्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पती सचिन माने यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.