मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदी सुदेश राणे

चिपळूण (प्रतिनिधी) : मराठा सेवा संघाच्या खेड तालुकाध्यक्ष पदी तुळशी येथील सुदेश राणे यांची निवड करण्यात आली असून राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी सावर्डे येथील जिल्हा आढावा बैठकीत त्यांना सन्मानित करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ नवनाथ घाडगे, मराठा सेवासंघ महासचिव अभि चंद्रशेखर शिखरे, उपाध्यक्ष संजय देसाई, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश भोसले, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुधीर भोसले, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, जिजाऊ ब्रिगेड महासचिव अनुजा राजे भोसले यांची उपस्थिती होती.