रत्नागिरी: कोकण रेल्वेने आज आपल्या 29 व्या ” स्मृती दिनी” कोकण रेल्वेच्या उभारणी मध्ये आपले प्राण गमावलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहिली.कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकासमोरील श्रम शक्ती स्मारक येथे आदरांजली वाहण्यात आली. कोकणच्या दऱ्या खोऱ्यातून कोकण रेल्वेची उभारणी ही एक मोठे आव्हान होते.कोकण रेल्वेच्या अभियंते,कर्मचारी,कामगारांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलत अशक्य वाटणाऱ्या कोकण रेल्वे प्रकल्पाची उभारणी केली.या उभारणी मध्ये विविध ठिकाणी झालेल्या 15 अपघातांमध्ये 12राज्यातून आलेल्या 95 जणांना आपले प्राण गमवावे लागले.कोकण रेल्वे गेली 29वर्षे या शहीदा ना 14ऑक्टोबर या स्मृती दिनी आदरांजली वाहते.कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत आज सकाळी कोकण रेल्वेच्या अधिकारी,कर्मचारी,कामगारांनी स्मृती स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली.यावेळी रत्नागिरी चे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी बी महामुनी उपस्थित होते.













