गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील कारूळ येथे मिशन बंधारे मोहीमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.पाणी अडवा पाणी जिरवाचा नारा देत येथील ग्रामस्थांनी गावात दोन वनराई बंधारे बांधले.
यावर्षी पावसाने लवकर पाठ फिरवली असून त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत.याच अनुषंगाने गुहागर पंचायत समितीच्या वतीने गावोगावी मिशन बंधारे मोहीम राबविण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर कारूळ गावामध्ये दोन बंधारे बांधण्यात आले.या बंधाऱ्यांच्या माध्यमातून गावातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी,माजी सरपंच मीनल जोशी, बचत गट,ग्रामपंचायत कर्मचारी,तसेच सर्व शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.













