वेंगुर्ले : प्रतिनिधी
सेवा संकल्प अभियान अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर आडेली आणि शिवस्वराज्य मित्रमंडळ आडेली यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवारी आडेली येथे घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २३ रक्तदात्यानी रक्तदान करत सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.
या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन करकर्माला पंचायत समिती सदस्य श्री. नितीन मांजेरकर, आडेली गावच्या प्रथम नागरीक श्रीम. यशस्वी कोंडसकर, उपसरंपच श्री. परेश हळणकर, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. विष्णू कोंडसकर, समाजसेवक श्री.राजू सामंत, आडेली वैद्यकिय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, डॉ. पाटील, आरोग्य सहाय्यक श्री. राजकुमार चव्हाण, आरोग्य निरिक्षक श्री.शेखर कांबळी, औषध निर्माण अधिकारी श्री. रविंद्र कडव, आरोग्य सेवक श्री. प्रसाद सावंत व निलकंठ बांदवलकर, श्री.शाम चव्हाण व अपर्णा घाडी, शिपाई श्री . शेडगे आणि मंदार धर्णे आणि ब्लड बँक सिंधूदूर्गची टीम उपस्थित होती.













