वालोपे येथून प्रौढ बेपत्ता

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील वालोपे देऊळवाडी येथील विनोद आयरे (४७) हे दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजताचे दरम्याने वालोपे देऊळवाडी येथून नापत्ता झाला आहेत.
त्याबाबत सौ. विजया विनोद आयरे यांनी चिपळूण पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने नापत्ता प्रकरण दाखल करण्यात आले आहे. सदर इसम हा अद्यापपर्यंत मिळून आला नाही. सदर व्यक्तीची उंची ५ फुट, रंग सावळा, अंगाने मजबूत, चेहरा उभट, नाक सरळ, डोक्याला साधारण पुढे टक्कल पडलेले तर सारखी तंबाखू खाण्याची सवय आहे. सदर व्यक्ती कोणाला आढळून आल्यास किंवा त्याचेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाल्यास चिपळूण पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.