बामणोली ग्रामविकास मंडळ मुंबईच्या अध्यक्ष पदी अशोक वनगे

मंडळाची जंबो कार्यकारिणी जाहीर

चिपळूण ( वार्ताहर): तालुक्यातील बामणोली ग्रामविकास मंडळ मुंबई संघटनेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अशोक वनगे यांची सर्वानुमती निवड करण्यात आले असून कार्याध्यक्षपदी दीपक डिंगणकर, सरचिटणीसपदी शशिकांत गमरे तर खजिनदार पदी दिगंबर कापले यांची निवड करण्यात आली आहे.

बामणोली गावातील नोकरी व्यवसायासाठी मुंबईत गेलेल्या सर्व चाकरमाणांची संघटना असून गेली अनेक वर्ष संस्था कार्यरत आहे. या आधी बामणोली ग्रामविकास मंडळ मुंबईची धुरा, सुनील डिंगणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती. या कार्यकारणीची मुदत संपल्यानंतर आता नवीन कार्यकारणी सर्वानुमते नेमण्यात आले आहे. मुंबई येथे झालेल्या सभेमध्ये नवीन कार्यकरणीची सर्वानुमते घोषणा करण्यात आली. या सभेमध्ये बामणोली ग्रामविकास मंडळ मुंबईच्या अध्यक्षपदी अशोक वांगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे श्री वनगे यांचे व्यक्तिमत्व आहे.
बामणोली ग्राम विकास मंडळाची जंबो कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे.
अध्यक्ष अशोक वनगे ,
कार्याध्यक्ष दीपक डिंगणकर ,
सरचिटणीस शशिकांत गमरे ,
खजिनदार दिगंबर कापले,
उपाध्यक्ष अजय डिंगणकर,
उपाध्यक्ष किशोर शिगवण,
कार्यवाहक विजय डिंगणकर ,सहसचिव विकास शिगवण , सहसचिव सुहास किजबिले, सहखजिनदार राहूल सुवरे , सहखजिनदार रविंद्र गमरे
कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रकाश चांदिवडे, हिरामण कोंडविलकर , संतोष कापले, राजाराम तांबिटकर, प्रकाश कोटकर, संतोष तांबिटकर,दीपक वणे, विवेक तांबे,मंगेश काणेकर, अजित तांबिटकर, दिनेश कोटकर, नरेश पाचकुडे , संदीप सुवरे, प्रमोद गमरे , अक्षय शिगवण,सचिन आग्रे,

अंतर्गत हिशोब तपासणीस म्हणून समीर पाले आणि रोहीत गोरीवले यांची निवड करण्यात आली आहे.
सल्लागार म्हणून सुधीर तांबे, सुनील डिंगणकर, महादेव पवार , नरेंद्र वणे, संतोष गोरीवले, आणि दीपक पागडे काम पाहतील. सर्वांनीच नवनिर्वाचित कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.