सिंधुदुर्गातील नवोदय विद्यालयात इयत्ता नववी व अकरावीच्या रिक्त जागांसाठी प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू

सिंधुदुर्ग : प्रधानमंत्री श्री जवाहर नवोदय विद्यालय, सिंधुदुर्ग येथे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता नववी व अकरावीतील रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरावेत, असे आवाहन विद्यालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

शिक्षण मंत्रालय, भारत सरकारद्वारे संचालित जवाहर नवोदय विद्यालय समिती, नोएडा यांच्यामार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इयत्ता नववीसाठी https://cbseitms.nic.in/2026/nvsix_9⁠ आणि इयत्ता अकरावीसाठी https://cbseitms.nic.in/2026/nvsix_11⁠ या संकेतस्थळांवर ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहेत.

 

प्रवेश अर्ज भरताना पालकांची स्वाक्षरी, विद्यार्थ्याची स्वाक्षरी, विद्यार्थ्याचा फोटो तसेच लागू असलेली जात प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारचे ‘नॉन-क्रीमी लेयर’ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

 

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत पूर्वी १५ ऑक्टोबर २०२६ होती. ती वाढवून आता २२ ऑक्टोबर २०२६ करण्यात आली आहे. तसेच २३ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्वी भरलेल्या अर्जांमध्ये लिंग, जात, ग्रामीण-शहरी किंवा दिव्यांगत्वासंबंधी माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

 

प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी ०२३६३-२४२७१३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच परीक्षा प्रमुख श्री. हेमंतकुमार जोंधळे (८०८०२२७३३०) आणि श्री. एस. पी. हिरमठ (७४४७०६६१४९) यांच्याशी संपर्क साधता येईल.

 

पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज भरून या प्रवेश संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रधानमंत्री श्री जवाहर नवोदय विद्यालय, सिंधुदुर्गचे प्राचार्य यांनी केले आहे.