परांजपे मोतीवाले हायस्कूल चिपळूणचे जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी

चिपळूण (प्रतिनिधी) : एस.व्ही.जे.सी. क्रीडा संकुल डेरवण येथे दि. १६ व १७ ऑक्टोबर रोजी पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय खोखो स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये परांजपे मोतीवाले हायस्कूलने १४ वर्ष मुलगे व 1१७7 वर्ष मुलगे व मुली या गटामध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अतिशय दैदीप्यमान कामगिरी करून १४ वर्ष मुलगे या गटामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
खो-खो स्पर्धेमध्ये १७ वर्ष वयोगटात मुलगे या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. १७ वर्ष वयोगट मुलगे या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या सर्व खेळाडूंचे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी शिंदे, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत देवळेकर, अरुण शिगवण, विकास चांदे, सौ मृणाल पवार, सोहम कदम, सौरभ तावडे यांनी मार्गदर्शन केले.