स्वामीदत्त इंटरप्राईजेस बिल्डिंग मटेरियल विक्री व्यवसायाचा शानदार शुभारंभ
अनेक मान्यवरांची उपस्थिती
चिपळूण (प्रतिनिधी) : व्यवसाय फक्त नुसता करणाऱ्यांनी करायचा असतो असे नाही होत तर तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद जेव्हा पाठीशी असतो आणि हे पाठीशी असलेले आशीर्वाद आम्हाला जेव्हा पूर्णपणे पाठिंबा रुपी मिळतात तेव्हाच खरोखरचा व्यवसाय होतो आणि तो नावारूपास येतो. गिमवी आणि जवळपासच्या गावातील ग्रामस्थांना घरबांधणी घर दुरुस्तीच्या कामांकरिता आवश्यक असलेले मटेरियल खरेदी करण्यासाठी खूप दूरवर चिपळूणमध्ये यावे लागत असे, येथील माजी सरपंच लतिफ लालू यांच्या आग्रहाने आणि ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन तरुण उद्योजक दयाळ उदेग आणि अवधूत मोरे यांनी एकत्र येऊन स्वामी दत्त एंटरप्राइजेस हा बिल्डिंग मटेरियल सप्लायचा नवा व्यवसाय सुरू केला आहे तेथून साहित्य खरेदी करणे ग्रामस्थांचा अत्यंत फायद्याचा विषय ठरणार आहे, असे प्रतिपादन कोकणातील प्रगतशील शेतकरी उद्योजक वसंत उदेग यांनी केले.
गुहागर तालुक्यातील गीमवी येथे तरुण उद्योजक दयाळ उदेग आणि अवधूत मोरे यांनी स्वामीदत्त एंटरप्राइजेस या नव्या व्यवसायाची शुक्रवारी सुरुवात केली, याचे उद्घाटन गावचे सरपंच वैभवी जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना उद्योजक वसंत उदेग बोलत होते. गिमवी गावातील ग्रामस्थांना घरबांधणी,दुरुस्ती, गावातील विकास कामांकरिता साहित्य खरेदी करण्यासाठी चिपळूण किंवा गुहागर अशा दूरच्या ठिकाणी जावे लागत होते प्रवास खर्चातही ग्रामस्थांचे अतिरिक्त पैसे जात होते. यावेळी आपण माझे मित्र वसंत उदेग यांना विनंती केली. आमच्या गावामध्ये बिल्डिंग मटेरियल विक्रीचा व्यवसाय सुरू व्हावा ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन उदेग यांनी या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलून आज स्वामीदत्त इंटरप्राईजेस नावाने प्रत्यक्षात बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय सुरू केला आहे. ग्रामस्थांकरिता ही एक आनंदाचीच बातमी आहे, असे प्रतिपादन गिमवी गावामध्ये वीस वर्ष सरपंच म्हणून पदभार सांभाळणारे सामाजिक कार्यकर्ते लतीफ लालू यांनी केले.
यावेळी सरपंच वैभवी जाधव, उपसरपंच महेंद्र गावडे यांनी आपल्या मनोकातून या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या तर श्री.निर्मळ यांनी वसंत उदेग यांचे आपण बालमित्र असल्याचे सांगून उदेग यांच्या वाटचालीविषयी आणि सुरुवातीच्या कष्टाविषयी काही आठवणींना उजाळा दिला. प्रगतशील शेतकरी चिपळूणमधील उद्योजक वसंत उदेग, माजी नगरसेवक विलास खेराडे, गिमवी गावच्या सरपंच वैभवी जाधव, उपसरपंच महेंद्र गावडे, अवधूत मोरे, दयाळ उदेग, माजी सरपंच लतिफ लालू, रफिक लालु, संजय मोरे, विजय जाधव, सुनील मोरे, नितीन मोरे, विलास मोरे, विशाखा सिमेंट पत्रे कंपनीचे श्री.मोहसीन, सुरेश कळंबटे, विनय कळंबटे, शांताराम घाणेकर, दत्ताराम घाणेकर, दीपक राऊत, तुकाराम बाईत, विशाल गोळेकर, किशोर लांबे, संदीप उदेग, प्रशांत चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.













