मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मालवण शहरातील भरड नवरात्रोत्सव मित्रमंडळाला भेट देत मंडळाच्या आयोजनातून विराजमान असलेल्या देवीचे मनोभावे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आमदार राणे यांच्या भेटीमुळे मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, शहरप्रमुख राजू बिडये, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाप्रमुख विनायक बाईत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, दिव्या दिपक पाटकर, अमृता अनिकेत फाटक, स्मिता प्रभाळे, साई पारकर, कुणाल खानोलकर, सुशील शेडगे यांसह भरड नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या सुष्मा तायशेटये, सुशांत तायशेटये, सुचिता तायशेटये, राजू आचरेकर, भाई हळदणकर, सिद्धी हळदणकर, प्रकाश करंगुटकर, मनिषा करंगुटकर यांसह मंडळाचे सदस्य व भाविक उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध मंडळांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होते. भाविकांकडून देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असून उत्सवातून धार्मिक परंपरा जपण्यासोबतच सामाजिक एकोपा आणि भक्तिभाव वृद्धिंगत होत आहे.













